संत गाडगेबाबा हे साध्या सोप्या शब्दांमध्ये ते विवेचन करायचे : एकनाथराव बोरसे..
अर्जुनी मोर येथे राजाभाऊ उंबरकर व अरुण धोबी यांचा प्रमुख उपस्थित गाडगे महाराज यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी..
अर्जुनी मोर : थोर समाज सुधारक वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा हे निरक्षर होते तरी त्यांनी आयुष्यभर शिक्षणाचा ध्यास घेतला होता. संत गाडगेबाबांनी आयुष्यभर समाजसेवा केली. मात्र स्वतःच्या नावाने आश्रम, मठ उभारणे त्यांना मान्य नव्हते. ते स्वतः म्हणायचे…”मी कुणाचा गुरु नाही, माझा कुणी चेला नाही. गावोगावी फिरून लोकांना समाजातील दोष समजावून सांगण्याचा निर्णय गाडगे बाबांनी घेतला. त्यांचे कीर्तन म्हणजे विवेचनकार आणि श्रोते यांच्यातील प्रश्नोत्तराचा सुलभ सादरीकरणाचा प्रबोधनात्मक अविष्कार होता. संत गाडगे बाबा हे साध्या सोप्या शब्दांमध्ये विवेचन करायचे त्यांचे विचार आजही समाजाने अंगीकारले पाहिजेत असे आवाहन अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांनी केले. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी /मोर येथे संत गाडगे महाराज यांची 150 वी जयंती महोत्सव दि. 28 फेब्रुवारी 2026 शनिवारी संत गाडगे बाबा सांस्कृतिक भवन मध्ये झाला. कार्यक्रम अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेऴी ते बोलत होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अतिथी म्हणुन महा. आरक्षण न्यायीक समिती कार्यध्यक्ष राजाभाऊ उंबरकर, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश संघटक अरुण धोबी, महा. परिट सेवा मंडळ नागपुर विभागीय अध्यक्ष जगन्नाथ फाले, आरक्षण न्यायीक समिती नागपुर विभागीय अध्यक्ष हेमराज तिरपूरकर, आरक्षण न्यायीक समिती चंद्रपुर जिल्हाध्यक्ष रवि मेधाम हे होते. परिट (धोबी) सेवा मंडळ महा. प्रदेश कार्याध्यक्ष सनत वाढई यांचा मार्गदर्शनाखाली श्री. संत गाडगे बाबा उत्सव समिती अर्जुनी/मोर, जि. गोंदिया महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ ता. अर्जुनी/मोर, जि. गोंदिया यांनी आयोजन केले होते. संत गाडगे बाबांच्या प्रतिमेस एकनाथराव बोरसे, राजाभाऊ उंबरकर व अरुण धोबी यांनी पुष्पहार अर्पण केला. व त्यांचा हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला!..”असा गजर करण्यात आला. सर्व सहभागी स्पर्धाकांना मान्यवरांचा हस्ते प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थीचा सत्कार करुन बक्षिस वितरण करण्यात आले. 150 व्या जयंती निमित्त गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेतल्या. त्यात सर्व सहभागी स्पर्धाकांना मान्यवरांचा हस्ते बक्षीस समारंभ संपन्न झाला. तसेच गुणवंत विद्यार्थीचा सत्कार करुन बक्षिस वितरण करण्यात आले. श्री. संत गाडगे बाबा उत्सव समिती, अर्जुनी/मोर. अध्यक्ष अशोक भाग्यवंत, सचिव सचिन मेश्राम, उपाध्यक्ष प्रेमदास बोरकर, कोषाध्यक्ष विकास कावळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सतिश कावऴे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बंधू – भगिनींनी प्रयत्न केले.