सोलापूर जिल्हा प्रतिनिधी (सागर गायकवाड करमाळा) :- टेंभुर्णी येथील श्री संत सेवा भजनी मंडळ व विठ्ठल रुक्मिणी संत गाडगेबाबा महाराज मंदिर समिती यांच्यावतीने दि. 14 ते 21 फेब्रुवारी यादरम्यान सदर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सदर सप्ताह दरम्यान ह.भ.प. दत्तात्रय गलांडे महाराज लासुर्णे, ह.भ.प.भूषण महाराज घाडगे तांबवे,ह.भ. प. विनायक काका टल्लू महाराज टेंभुर्णी, ह.भ.प. अभिमन्यू जगताप पाटील महाराज गणपती अकोले, ह.भ.प.महेश शिंदे महाराज आढेगाव, ह.भ.प. चैतन्य बारवकर महाराज निमगाव केतकी, ह.भ.प. महंत लक्ष्मण बाबा मेगडे महाराज नेकनूर, यांनी तर सलग सात दिवस कीर्तन सेवा व काल्याचे प्रसिद्ध कीर्तन ह भ प किसन पवार महाराज आंबेजोगाई बीड यांचे संपन्न झाले.
या सप्ताहामध्ये दररोज पहाटे चार ते सहा काकडा आरती सकाळी सात ते दहा शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सकाळी दहा ते दुपारी बारा श्री संत तुकाराम महाराज गाथा भजन दुपारी तीन ते पाच बजेट सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सायंकाळी सात ते नऊ हरी किर्तन व तदनंतर महाप्रसाद व दहा ते बारा हरी जागर याप्रमाणे कार्यक्रमाचे रूपरेषा साकारण्यात आली.
या सप्ताह दरम्यान किर्तन सौजन्य व अन्नदात्यांकडून भोजनदान करण्यात आले. तसेच गुरुलिंग पांडुरंग पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य टेंभुर्णी यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त श्री सुधीर गुरुलिंग पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य टेंभुर्णी यांचे तर्फे काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर सप्ताह दरम्यान विजय विठ्ठल कुठे बाळासाहेब भाऊराव पाटील मोहन पांडुरंग कोकाटे विनायक सूर्यकांत लोंढे सुभाष दगडू करगळ मुकुंद दादा कुंडलिक लोंढे दौलत दादा संभाजी पाटील प्रल्हाद आप्पा संभाजी पाटील यांचे अन्नदानाकरिता विशेष सहकार्य लाभले.
सप्ताहाचे संयोजक श्री सुदाम नाना पांडुरंग लोंढे, प्रवीण भैय्या लोहार, गणेश बापू के चे बलभीम आप्पा लोंढे सुदाम जोगदंड सर पुणे सागर पाटील समाधान पाटील भारत लोंढे सौदागर कुठे नामदेव मामा पाटील निलेश शिवाजी लोंढे भारत बापू वळसे गाडगे रावसाहेब नागेश मधुकर लोंढे सतीश नेवसे संतोष भीमराव कुटे सिद्धेश्वर लोंढे सतीश लोंढे स्वप्नील सुदाम लोंढे तानाजी लोंढे कैलास लोंढे किरण गोपीनाथ लोंढे आदींनी सदर सप्ताहाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले