“अमळनेर फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जलशुद्धीकरण केंद्रास भेट”
अमळनेर : विक्की जाधव
विद्यार्थ्यांनी केवळ वर्गात बसून पुस्तकी ज्ञान मिळवू नये, तर त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात कसा वापर होतो हे अनुभवावे, या उद्देशाने प्रा. अनिल बोरसे यांनी अमळनेर फार्मसी कॉलेजच्या पदविका विभागासाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला.

स्थानिक जलशुद्धीकरण केंद्रास (Water Purification Plant) भेट देऊन विद्यार्थ्यांनी विज्ञानातील क्लिष्ट प्रक्रिया प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या. श्री.गणेश शिंगारे यांनी विद्यार्थ्यांना Purification Plant बद्दल मार्गदर्शन केले.या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ शैक्षणिक माहिती देऊन हा दौरा थांबला नाही, तर प्रा. अनिल बोरसे यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे देखील आयोजन केले होते. या स्नेहभोजनाच्या निमित्ताने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद वाढून एक कौटुंबिक वातावरण निर्माण झाले. “वर्गातील शिक्षणापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात आणि प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी घेतलेले शिक्षण अधिक काळ स्मरणात राहते,” असे मत यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.देवेश भावसार, प्रा.शिवानी शर्मा, प्रा.हर्षदा पवार, प्रा.मानसी उपासनी, प्रा.प्रियांका महाजन, प्रा.वैशाली कुलकर्णी व श्री.ज्ञानेश्वर चौधरी, श्री. जगदीश सोनवणे, श्री.महेश सोनजे उपस्थित होते.