न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

पत्रकार दिनानिमित्त परिट धोबी समाजातील पत्रकारांचा सत्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

पत्रकार दिनानिमित्त परिट धोबी समाजातील पत्रकारांचा सत्कार

 

अमळनेर : विक्की जाधव.

दि. ६ जानेवारी  मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आणि पत्रकार दिनाच्या औचित्याने अमळनेर येथे परिट धोबी समाजातील पत्रकारांच्या डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. हा सोहळा संत गाडगेबाबा चौकात पार पडला.पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, समाजातील सत्य उघडकीस आणणे, वाढत्या अनिष्ट रुढी-परंपरांविरोधात लढणे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करणे यासाठी पत्रकार निष्ठेने आणि परिश्रमाने कार्य करतात, हे प्रेरणादायी असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.या सोहळ्यात पत्रकार विकी जाधव आणि पत्रकार मनोज चित्ते यांचा संत गाडगेबाबा यांचे पुस्तक, लेखणी आणि बुके देऊन विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा चौकातील संत गाडगेबाबा स्मारकाचे पूजन व माल्यार्पण समाजबांधव विकास सपके आणि राजेंद्र ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार ईश्वरजी महाजन, पत्रकार उमाकांत ठाकूर, यांचा ही सत्कार करण्यात आला मंगरूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, प्रा. डॉ. रमेश माने, वाघोदा जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका दीपाली अमोल जाधव, परीट धोबी समाजाचे अमळनेर तालुकाध्यक्ष गंगाराम वाल्हे, शहराध्यक्ष रवींद्र जाधव, सचिव विजय वाघ, किशोर महाले, भरत जावदेकर, अनिल वाघ, गणेश नेरकर, अनिल मांडोळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच युवा परिट धोबी मंडळ अमळनेरचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमास युवा परिट धोबी मंडळ अमळनेरचे अनमोल सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ग्रंथालयाचे अध्यक्ष दीपक वाल्हे यांनी अत्यंत सुरेखरीत्या पार पाडले.या उपक्रमामुळे स्थानिक पत्रकारांचे समाजहिताचे कार्य अधिक दृश्यमान झाले असून, नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!