गैर-आदिवासी जातींना अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात सामावून घेण्याचा प्रयत्न खापवून घेतला जाणार नाही.
अमळनेर : विक्की जाधव
गैर-आदिवासी समाजजातींना अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी पारधी क्रांती संघटनेने ठाम इशारा दिला आहे. अमळनेर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून संघटनेने स्पष्ट केले की, “अनुसूचित जमाती प्रवर्ग हा फक्त आदिवासी समाजाचा आहे, त्यात इतर कुणाला घुसखोरी करू देणार नाही!” संघटनेने चेतावणी दिली की, जर शासनाने असा निर्णय घेतला, तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाज एकवटून मुंबईसह राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल. “आमचे अस्तित्व, आमची अस्मिता आणि आमचे आरक्षण हे आमचेच आहे. त्यावर कुणी हात घालण्याचा प्रयत्न केल्यास शांत बसणार नाही,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

संघटनेच्या ठाम मागण्या अशा :
1. गैर-आदिवासी जातींना ST प्रवर्गात सामावून घेण्याचे प्रस्ताव तात्काळ नाकारावेत.
2. संविधानानुसार ST प्रवर्ग फक्त आदिवासी समाजापुरता मर्यादित आहे, हे शासनाने सार्वजनिकपणे जाहीर करावे.
3. आदिवासी समाजाच्या घटनेनं दिलेल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी शासनाने ठोस आणि स्पष्ट भूमिका घ्यावी.