घरगुती उपयोगी वस्तू वाटप कार्यक्रम रद्द – कामगार कल्याणकारी मंडळाचा निर्णय.
मार्मिक न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र भवन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत कामगारांना दिल्या जाणाऱ्या घरगुती उपयोगी वस्तूंच्या संचाचे वाटप दिनांक ०६/०६/२०२५ रोजी नियोजित होते. मात्र, संगणकीय प्रणालीतील सुधारणा (Software Upgradation) कार्य सुरू असल्यामुळे हा कार्यक्रम तात्पुरता रद्द करण्यात आला आहे.
या निर्णयाबाबत मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक कोरडे यांनी अधिकृत पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. संगणक प्रणाली सुधारणा पूर्ण होईपर्यंत कोणताही वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार नाही.
कार्यक्रम रद्द करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे नवीन संगणकीय प्रणालीतून कामकाज पारदर्शक व सुगम पद्धतीने पार पाडणे. त्यामुळे संच वितरणाची पुढील तारीख सुधारणा पूर्ण झाल्यानंतरच जाहीर करण्यात येईल.
नागरिकांसाठी सूचना:
०६ जून २०२५ रोजी होणारा संच वाटप कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
नवीन दिनांक लवकरच जाहीर करण्यात येईल. वाटपासाठी पुन्हा नव्याने नियोजन करण्यात येणार आहे. संबंधित सर्व कार्यालयांनी आयोजनापासून सध्या वंचित राहावे.
कामगार बांधवांनी संयम बाळगावा व पुढील सूचना अधिकृतपणे प्राप्त होईपर्यंत वाटपासाठी कोणतीही हालचाल करू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.