करमाळा प्रतिनिधी :- “उपनिबंधक सहकारी संस्था गट -अ” या संवर्गातील परीविक्षाधीन अधिकारीश्रीमती अपर्णा यादव यांची प्रशिक्षण कालावधीमध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करमाळा या पदी नियुक्ती झालेली आहे .एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम मधील परीविक्षाधिन उपनिबंधक सहकारी संस्था गट – अ यांना लगतपूर्व सहायक निबंधक सहकारी संस्था गट -ब या पदाचा स्वतंत्र पदभार सोपविणे बाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे दिपक तावरे यांनी नुकतेच आदेश पारित केलेले होते . यामध्ये सहाय्यक निबंधक करमाळा या रिक्तपदी दिनांक २ सप्टेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीसाठी श्रीमती यादव यांची करमाळा येथे नियुक्ती झाली आहे .श्रीमती यादव आज सहाय्यक निबंधक कार्यालय करमाळा येथे रुजू झाल्या .
या प्रसंगी त्यांचा सत्कार अर्बन बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश क्षीरसागर व सहायक निबंधक बेंडारी तसेच करमाळा अर्बन बँक कर्मचारी वृंद यांच्या वतीने करण्यात आला.