भगवानराव गायकवाड प्रतिष्ठानचे कार्य नेत्रदीपक: ह.भ.प. प्रदीप नलवडे
(निलेश गायकवाड)
इंदापूर :डिकसळ ( ता.इंदापुर) येथील ग्रामदैवत योगेश्वरी मंदिरात गोकुळष्टमीच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते ८ दिवस चालू असलेल्या किर्तन महोत्सवाची सांगता ह.भ.प. प्रदीप महाराज नलवडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी गोकुळातील श्रीकृष्ण जन्म व शिवचरित्राचे सुंदर वर्णन ऐकत उपस्थित भाविक कीर्तनामध्ये तल्लीन झाले होते. प्रताप गवळी व कल्याण झिटे या अन्नदात्यांनी काल्याचा महाप्रसाद दिला. गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने गेली ३४ वर्ष अखंडपणे या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन होत आहे. यामध्ये पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ८ ते ११ गाथा वाचन सायंकाळी ५ ते ६ प्रवचन,६ते ७ हरिपाठ रात्री ९ ते ११ हरी किर्तन व ११ ते पहाटे ४ हरीजागर असा दैनंदिन कार्यक्रम पार पडला.दरम्यानच्या काळात ह.भ.प. गणेशानंद महाराज पिडीयार,ह.भ.प.हरिष महाराज फडके,ह.भ.प.वसंत महाराज काळे, ह.भ.प.अमोल महाराज सुळ,ह.भ.प.शेषांगर महाराज बोबडे, ह.भ.प.वैशाली महाराज महारनुर ,ह.भ.प. कबीर महाराज आत्तार यांनी कीर्तन सेवेतुन समाज प्रबोधन केले.ग्रामस्थांच्या सहकार्याने सलग ८ दिवस अहोरात्रपणे विना घेऊन अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता झाल्याची माहिती व्यासपीठ चालक ह. भ.प.नागरगोजे महाराज आळंदीकर यांनी दिली यावेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील भगवानराव गायकवाड विकास प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार गायकवाड यांच्या वतीने गेले ३४ वर्ष वारकरी संप्रदायात उल्लेखनीय योगदान दिलेल्या ज्ञानदेव मारुती पवार, प्रताप सिताराम गवळी, देविदास नामदेव गायकवाड, मोहनराव तुकाराम काळे व ज्ञानदेव विष्णू कुंभार यांना ह.भ.प. प्रदीप महाराज नलवडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. भगवानराव गायकवाड प्रतिष्ठानचे हे कार्य नेत्रदीपक असल्याचे भावना नलावडे महाराज यांनी व्यक्त केली यावेळी परिसरातील भाविक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.