हिंदू नववर्ष पाडव्यानिमित्त उद्या अमळनेर शहरात निघणार भव्य शोभायात्रा..
अमळनेर : विक्की जाधव.
हिंदू नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा पाडव्यानिमित्त उद्या अमळनेर शहरात भव्य शोभायात्रा अमळनेर शहरातील राष्ट्रप्रेमी धार्मिक सामाजिक संस्थांच्या मंडळाच्या सहकाऱ्यांने भव्य शोभायात्रा सकाळी ठिक ८:०० वाजता बन्सीलाल पॅलेस प्रताप मिल येथून निघणार असून, पाडवा शोभायात्रा मिरवणूक मार्गावर आपले प्रांगण झाडून सडा शिंपडून नागरिकांनी रांगोळ्या काढाव्यात, भव्य गुढी उभारून पुष्पवृष्टी करून आपणा शक्य होईल त्या पद्धतीने शोभायात्रेत सहभागी व्हावे भारतीय पद्धतीने नववर्षाचे स्वागत करून शोभायात्रेचा आनंद लुटावा. असे आव्हान आयोजकांनी केले आहे.
असा असेल शोभायात्रेचा मार्ग..
प्रताप मिल, स्टेशन रोड, स्वामीनारायण चौक, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, वाडी चौक, माळीवाडा, झामी चौक, पवन चौक, कुंटे रोड, पाच पावली मंदिर, बस स्टॅन्ड, विजय मारुती मंदिर. होऊन डाग बंगला ग्राउंड वर संपन्न होईल.