June 29, 2025 10:38 pm

तरुणांनो,नववर्षाच्या स्वागतासाठी हुल्लडबाजी,’ड्रिंक अँड ड्राईव्ह’ नकोच, अन्यथा कारवाई

अपनी भाषा में पढ़े! Translate

तरुणांनो,नववर्षाच्या स्वागतासाठी हुल्लडबाजी,’ड्रिंक अँड ड्राईव्ह’ नकोच, अन्यथा कारवाई

कर्जत पोलिसांकडून ‘अलर्ट’; गस्ती,नाकेबंदीसह अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत दि.३० वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ‘थर्टी फस्ट’च्या निमित्ताने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांकडून वेगवेगळ्या प्रकारे जल्लोष साजरा करण्यात येतो. मग तरुणाईकडून दारू, पार्ट्यासह हुल्लडबाजी आणि दारू पिऊन वाहने चालवणे असे प्रकार केले जातात. मात्र आपल्याही डोक्यात अशी कल्पना असेल तर सावधान! कारण कर्जत पोलिसांकडून अशा हुल्लडबाजीवर कारवाई करण्यासाठी फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
कर्जत पोलिसांकडून नियंत्रणासाठी तालुक्यात विविध ठिकाणी गस्तीची तीन वाहने तैनात करण्यात आली आहेत. कर्जत शहरासह राशीन या गर्दीच्या ठिकाणी नाकेबंदी करण्यात आलेली आहे. याकामी ५ पोलीस अधिकारी, २५ पोलीस कर्मचारी, १० होमगार्ड असा फौजफाटा नेमण्यात आला आहे. कर्जतसह राशीन तसेच अनेक गावांमधून राज्यमार्ग जातो. सध्या या मार्गावर मोठी रहदारी असते अशावेळी ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ केलेल्या अनेक वाहनांकडून अपघाताचा मोठा धोका निर्माण होतो.दारू पिऊन अपघात घडल्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत घडल्या आहेत त्यामुळे या सर्व बाबींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता कर्जत पोलिस अलर्ट झाले आहेत.’तरुणाईने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नको त्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाही. घरी राहून कुटुंबासोबत आनंदाने नववर्षाचे स्वागत करावे.जर कुणी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.

  

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!