प्रतिनिधी: श्री.दादासाहेब नन्नवरे
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे हायस्कूल बीड,जि.बीड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे कुलगुरु मा.प्रा.डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मा.माधव बेले यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ.प्रमोद येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की,”संस्थेच्या ब्रीदवाक्यानुसार ज्ञान, विज्ञान तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून नागरिक संस्कारशील घडावेत,शिक्षण माध्यमाचा विचार करता आपल्या पाल्यांवर “रेन रेन गो अवे” च्या ऐवजी “येरे येरे पावसा” असे भारतीय संस्कार विद्यार्थ्यांना मिळावेत ,तसेच महाराष्ट्रातील महामानव पैकी एक डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवनाचा त्यांनी गौरवाने उल्लेख केला.तर “जगभरातील पुतळे प्रेरणादायी असतात, त्या पुतळ्याभोवती सकारात्मक ऊर्जा आपल्याला सतत प्रेरणा देत असते, पण पुतळ्यांचे पावित्र्य राखले जावे”अशी भावना संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केली.

संस्थेच्या मराठवाडा विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ.जयसिंगराव देशमुख आपल्या मनोगतात म्हणाले की,” समाजात शिक्षकाचे स्थान सर्वोच्च असल्यानेच डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षकांना” गुरुदेव कार्यकर्ते “अशा शब्दाचा वापर केला होता,बीडचे माजी आमदार मा. राजेंद्र जगताप यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील “ही शाळा आपल्या वाड्यात भरत होती त्यानंतर शाळेला नवीन इमारत आणि जागेसाठी वडिलांनी प्रयत्न केला असल्याची आठवण त्यांनी व्यक्त केली.”संस्थेचे कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे हे आपल्या मनोगतात म्हणाले की,” बापूजींच्या शिक्षणाचा वारसा पुढे चालवण्याचे पवित्र कार्य करण्याची संधी मला संस्थेच्या पदाधिका-यांनी दिली म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो”.नूतन मराठी शाळा,शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे हायस्कूल व अध्यापक विद्यालय बीड यांनी कार्यक्रमाचे सुनियोजन केले..कार्यक्रमाला प्रा. सुशीलाताई मोराळे मा. गौतम खटोड, प्राचार्य संभाजी भोसले, सुलोचनाताई वारे, प्रा. संजय पाटील, माजी प्राचार्य रमेश दाबके, प्राचार्य तु.भ. मनेर , ॲड.बाळासाहेब कोल्हे,हेमंत आवटी तसेच संस्थेच्या मराठवाडा विभागातील शाखांचे प्रमुख, शिक्षक-शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती मुंडे व वैभव आगळे यांनी केले,तर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर सरकुंडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.