इंदापूर तालुका सचिवपदी सौ. उज्वलाताई परदेशी यांची निवड
प्रतिनिधी :- अजिनाथ कनिचे
इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव च्या विद्यमान कार्यक्षम सरपंच, उत्तम वक्त्या सौ.उज्वलाताई परदेशी यांची इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस सचिव पदी निवड करण्यात आली. पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा भारती ताई शेवाळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली ताई , तालुकाअध्यक्ष छायाताई पडसळकर , इंदापूर शहर अध्यक्ष उमाताई इंगोले , रेहना मुलांनी मॅडम महाराष्ट्र राज्य मच्छिमार कृती समिती संघटना अध्यक्ष सिताराम भैया नगरे यांच्या उपस्थितीमध्ये विद्यमान सरपंच उज्वलाताई दत्तात्रय परदेशी यांची इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा भारतीताई शेवाळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या कुंभारगाव च्या सरपंच सौ .उज्वला ताई यांनी अल्पावधीतच गावामध्ये खूप मोठी विकासात्मक कामे राबवले असून तसेच राज्य मंत्री माननीय दत्ता मामा भरणे यांच्या निधीतून मोठी मोठी कामे केले आहेत. चिकाटी व संघटन कौशल्य पाहून आम्ही त्यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सचिव पदी निवड करीत आहोत. तसेच उज्वला ताई यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी व संघटन मजबूत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी सौ उज्वला ताई म्हणाल्या की इंदापूर तालुक्यामध्ये महिला राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी तन-मन-धनाने प्रयत्न करून येणाऱ्या निवडणूकी मध्ये घड्याळाचा डंका वाजालाच पाहिजे. तसेच जेव्हा एक गृहिणी आपलं घर पुढे नेण्यासाठी प्रयत्न करते तशी निष्ठा ठेवून आपण आपल्या पक्षासाठी काम केलं पाहिजे व माझ्यावर दिलेल्या जबाबदारीचे व संधीचे नक्कीच सोने करेन असे त्यांनी यावेळी सांगितले.