June 30, 2025 3:33 am

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिका मुख्यालयात पावसाळा पूर्व आढावा बैठक संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिका मुख्यालयात पावसाळा पूर्व आढावा बैठक संपन्न
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईमधल्या दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या डोंगर उतारावरच्या परिसरात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अतिरिक्त तीन तुकड्या तैनात करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे. पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिका मुख्यालयात पावसाळा पूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पावसाळापूर्व नालेसफाईबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश दिल्याचं ते म्हणाले.

महापालिका क्षेत्रातल्या रस्त्यांची पावसाळ्यात काळजी घेण्याच्या दृष्टीनं महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये समन्वय अधिकारी नेमण्याचे निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय पावसाळ्यात दिवसातून दोनदा घन कचरा उचलण्याची कार्यवाही करावी, महापालिका क्षेत्रातल्या झाडांची चाचणी शास्त्रीय पद्धतीनं करावी, डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार रोखण्यासाठी कीटक नियंत्रण विभागानं विविध वस्त्यांमध्ये जाऊन पाहणी करावी असे निर्देश संबंधित यंत्रणेला दिल्याचं त्यांनी सांगितलं.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!