खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे मुख्यद्वार पर्यटकांसाठी पाच दिवसांसाठी बंद
प्रतिनिधी-शेखर शिरसाट
औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथल्या औरंगजेबाच्या कबरीचं मुख्यद्वार पर्यटकांसाठी पाच दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद विभागानं यासंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. या कबरीसंबंधी सध्या विवाद सुरु असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी २२ मे पर्यंत कबर बंद ठेवण्यात आली आहे. मुख्य प्रवेश द्वारावर दोन सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आलं असून, आगामी काळात परिस्थिती पाहता आणखी पाच दिवस कबर बंद ठेवली जाऊ शकते असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.