विठूनामाच्या गजरात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगली आषाढी एकादशी; दिंडी, रिंगण सोहळ्याने भारावले भक्तिमय वातावरण

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260724-WA0941

विठूनामाच्या गजरात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगली आषाढी एकादशी; दिंडी, रिंगण सोहळ्याने भारावले भक्तिमय वातावरण

 

अमळनेर : विक्की जाधव.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीचा अखंड गजर करत पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा अत्यंत उत्साह, भक्तीभाव आणि सांस्कृतिक परंपरेच्या साक्षीने जल्लोषात साजरा करण्यात आला. विठू नामाचा अखंड जयघोष, टाळ-मृदुंगाचा निनाद, पारंपरिक दिंडी यात्रा आणि रिंगण सोहळ्यामुळे संपूर्ण शाळा परिसर जणू पंढरपूरच्या चंद्रभागा तीरावरील वारीचेच दर्शन घडवत होता.

IMG-20260724-WA0983
 पांडुरंगाच्या भक्तीतलीन असलेला बाल वारकरी, पोशाखात अर्णव जाधव.

सकाळच्या मंगलमय वातावरणात शाळेच्या प्रांगणात आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट आणि पारंपरिक कमानींनी भक्तिमय वातावरणाची निर्मिती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत मुक्ताबाई तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषेत सहभागी होत वारकरी परंपरेचा सुंदर आविष्कार साकारला. “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. विशेष आकर्षण ठरलेल्या रिंगण सोहळ्यात विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या तालावर उत्स्फूर्त सहभाग घेत भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवला. तसेच दक्षा शर्मा हिने साकारलेले विठुरायाचे प्रतीकात्मक पात्र उपस्थितांची मने जिंकून गेले.

यावेळी पालखी पूजन मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी आणि पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत वंजारी, व्ही. जी. बोरोले, अशोक महाजन, व्ही. एस. अमृतकर, एस. पी. पाटील, सविता पारधी, योगिशा महाजन, अनंत बागल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि भक्तीची मूल्ये रुजविणारा हा सोहळा सर्वांच्या स्मरणात कायम राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!