भिगवन शेटफळ गटाचे निकालाकडे लागले लक्ष; तिरंगी लढतीमध्ये कोणाचा होणार विजय आणि कोण मारणार बाजी?

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवन शेटफळ गटाचे निकालाकडे लागले लक्ष; तिरंगी लढतीमध्ये कोणाचा होणार विजय आणि कोण मारणार बाजी?

(निलेश गायकवाड)

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान काल दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी शांततेत पार पाडले. यामध्ये भिगवन शेटफळ गटातील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाही दिवस शांततेत पार पाडला. भिगवन शेटफळ गटाचे एकूण मतदान 41990 पैकी 28290 एवढे मतदान झालेले असून. यामध्ये भिगवण गणाचे मतदान 21083 पैकी 13567 एवढे तर शेटफळ गणाचे मतदान 20907 पैकी 14723 एवढे मतदान झालेले आहे.

भिगवन शेटफळ गटामध्ये यामध्ये प्रामुख्याने तरंगी लढत झालेली असून या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भिगवण शेटफळ जिल्हा परिषद गटासाठी सौ.मेघना तुकाराम बंडगर तसेच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ. कोमल हरिश्चंद्र बंडगर व तसेच अपक्ष उमेदवार म्हणून सौ.सोनाली स्वप्नील बंडगर यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत झाली असून तसेच पंचायत समितीच्या भिगवन गणाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सौ हेमा माडगे तसेच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्राजक्ता वाघ यामध्ये मुख्य लढत झाली. शेटफळ गढे गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार जितेंद्र वनवे तसेच भारतीय जनता पार्टी कडून दत्तात्रय वनवे यांच्यामध्ये लढत झाली.

आता उद्याच्या होणाऱ्या निकालाकडे भिगवण शेटफळ गटातील जनतेने कोणाकडे कौल दिला कोणाच्या पार्टीला आपली साथ दिली याकडे संपूर्ण भिगवन कशेटफळ गटाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण शेटफळ गट हा संपूर्ण पिंजून काढून त्यांना आपल्या कामाचे व विकासाचे व्हिजन लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये किती यशस्वी झालेत तसेच स्व. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची सहानुभूती किती मिळाली हे सुद्धा लक्षणीय राहील.

तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आलेले उमेदवार यांचे लोकांपर्यंत असलेला संपर्क तसेच भारतीय जनता पार्टीचे इंदापूरचे नेते प्रवीण माने, प्रदीप गारटकर यांनी केलेला जो उमेदवारांचा प्रचार आणि त्यांना दिलेला विश्वास तसेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात असणारे व्हिजन हे नागरिकांनी कितपत स्वीकारला असेल हे निकालावरून समोर येईल..

तसेच अपक्ष उमेदवार यांनी देखील भिगवन शेटफळ गटामध्ये आपल्या प्रचाराच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले असले तरी त्यांची हे प्रयत्न तसेच त्यांचा असलेला जनसंपर्क नागरिकांनी किती स्वीकारला असेल हे उद्याच्या होणाऱ्या निकालावरून समोर येईल.

त्यामुळे भिगवन शेटफळ गटातील जनतेने कोणाला स्वीकारले आणि कोणाला नाकारले हे आपण येणाऱ्या काळात बघू..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!