करमाळा नगरपरिषदेचे कर्मचारी बाळनाथ क्षीरसागर सेवानिवृत्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा नगरपरिषदेच्या विद्युत विभागातील कर्मचारी बाळनाथ क्षीरसागर (कुंभार) हे आपल्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त नगरपरिषद कार्यालयात एका विशेष निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम प्रसंगी मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्या हस्ते बाळनाथ क्षीरसागर यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नीचाही सन्मान करण्यात आला; हा सन्मान बांधकाम विभागाच्या अश्विनी जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. कर्मचाऱ्याच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा क्षण उपस्थितांना भावूक करून गेला.
मनोगतातून भावनांना वाट मोकळी करण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप शिंदे आणि आरोग्य विभागाचे अनुप कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकाळात विद्युत विभागाची जबाबदारी अत्यंत तत्परतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडल्याचे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्याला नगरपरिषदेचे विविध विभागातील प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने कार्यालय अधीक्षक स्वप्नील बाळेकर, लेखापाल हिंदुराव जगताप, अंतर्गत लेखापाल सरवदे, विद्युत विभाग प्रमुख शशांक भोसले, बांधकाम अभियंता आकाश वाघमारे, भांडारपाल सुप्रिया पालखे, आरोग्य निरीक्षक विपुल पुजारी आदी अधिकारी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सागर गायकवाड यांनी केले. उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाळनाथ क्षीरसागर यांना त्यांच्या पुढील निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!