दिव्यांगांच्या हक्कासाठी मांडळमध्ये; ५ टक्के निधीसाठी ग्रामपंचायतीला निवेदन, उपोषणाचा इशारा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

दिव्यांगांच्या हक्कासाठी मांडळमध्ये; ५ टक्के निधीसाठी ग्रामपंचायतीला निवेदन, उपोषणाचा इशारा.

 

अमळनेर : विक्की जाधव.

मांडळ येथे दिव्यांग बांधवांनी एकत्र येत आपल्या न्याय्य हक्कासाठी ठाम भूमिका घेतली. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नियम ३७) ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून दिव्यांग कल्याणासाठी राखीव असलेला ५ टक्के निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष श्री. शांताराम सखाराम कोळी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत व ग्रामसेवक श्री. प्रांजल वाघ तसेच सरपंच श्री. दीपक बडगुजर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी “निवेदनाकडे दुर्लक्ष झाल्यास ग्रामपंचायतसमोर अन्नत्याग उपोषण छेडण्यात येईल,” असा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात्मक निवेदनप्रसंगी विविध जाती-धर्मातील दिव्यांग बांधव, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोळी समाज जिल्हाध्यक्ष रावसाहेब कोळी, समाजसेवक संदीप सर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष वासुदेव पवार यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिव्यांगांच्या मागणीला पाठिंबा दिला. दिव्यांग दीपक बडगुजर, जितेंद्र कोळी, अमृत कोळी, नागो महाजन, हिरामण मराठे, जफर शेख, दानिश बेग, रेखाबाई पारधी, जयश्री कोळी यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून “हा निधी दया नसून आमचा हक्क आहे,” असा ठाम संदेश दिला. या एकजुटीमुळे मांडळमध्ये दिव्यांगांच्या हक्कांचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!