दहिवद गावाचा मान उंचावला! विकास मंचतर्फे नगरसेविका हेमांगी व ऐश्वर्या सोनवणे यांचा गौरवपूर्ण सत्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

दहिवद गावाचा मान उंचावला! विकास मंचतर्फे नगरसेविका हेमांगी व ऐश्वर्या सोनवणे यांचा गौरवपूर्ण सत्कार..

 

अमळनेर : विक्की जाधव.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दहिवद गावाच्या सुपुत्र श्री. अंकुश सोनवणे यांच्या पत्नी सौ. हेमांगी सोनवणे व त्यांची कन्या कुमारी ऐश्वर्या सोनवणे यांनी नगरसेवकपदी दणदणीत विजय मिळवल्याने दहिवद गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल दहिवद विकास मंचच्या वतीने सौ. प्रतिभा देसले (पोलीस पाटील, दहिवद) यांच्या निवासस्थानी सोनवणे परिवाराचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. गावाच्या मातीतून घडलेल्या कर्तृत्वाचा सन्मान करताना ग्रामस्थांचा अभिमान स्पष्टपणे दिसून येत होता.

या सत्कार समारंभाला गाव व परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. भारतीय कृषी अनुसंधान परिषद सदस्य श्री. दिनेश पाटील, संचालिका सौ. संगीता पाटील, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपआयुक्त श्री. निलेश भदाणे यांच्यासह पंचायत समिती, ग्रामपंचायत व सहकारी संस्थांतील माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी सोनवणे परिवाराच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचे कौतुक करत शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. अंकुश सोनवणे यांनी दहिवदच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. सौ. हेमांगी सोनवणे यांनी ग्रामस्थांनी दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत गावाचे ऋण आयुष्यभर फेडण्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमातून दहिवदच्या ऐक्याची, विकासाची व अभिमानाची भावना अधिक दृढ झाली. सूत्रसंचालन श्री. सुभाष देसले यांनी तर आभारप्रदर्शन श्री. शिवाजी पारधी यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!