प्लास्टिक बंदी कागदावरच? अमळनेर शहरात प्लास्टिकचा सर्रास होतोय वापर कार्यवाही शून्य.

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्लास्टिक बंदी कागदावरच? अमळनेर शहरात प्लास्टिकचा सर्रास होतोय वापर कार्यवाही शून्य.

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरात प्लास्टिक बंदी लागू असतानाही प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच दिसून येत आहे. शहरातील भाजी मार्केट, मच्छी बाजार, मटण दुकाने तसेच छोटे-मोठे किरकोळ विक्रेते याठिकाणी प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक साहित्याचा सर्रास वापर सुरू आहे. शासनाने पर्यावरण संरक्षणासाठी कठोर निर्णय घेतले असतानाही, त्याची अमलबजावणी मात्र अमळनेरमध्ये फक्त कागदावरच असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

विशेष म्हणजे या कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या अमळनेर नगरपरिषदेची कोणतीही ठोस ‘धडक’ कारवाई अद्याप दिसून आलेली नाही. बाजारपेठांमध्ये खुलेआम प्लास्टिकचा वापर होत असताना, ना दंडात्मक कारवाई, ना जनजागृती मोहीम. अशी उदासीन भूमिका नगरपरिषदेची पर्यावरणाबाबतची गांभीर्याची पातळीच प्रश्नांकित करते आहे. यामुळे नागरिकांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे.

दरम्यान, प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान, नाले तुंबणे, आणि फिरणारे गुरे यांच्या आरोग्याचे प्रश्न याची जाणीव नागरिकांना आहे. त्यामुळे या प्रश्नावर केवळ चर्चा न करता विविध स्तरांवरून कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा ‘प्लास्टिकमुक्त शहर’ ही संकल्पना फक्त घोषणांपुरतीच मर्यादित राहणार का? असा सवाल आता अमळनेरकर विचारू लागले आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!