वाटलुज गावामध्ये जगदाळे आणि भोसले यांचा जोरदार प्रचार…
सध्या दौंड तालुक्यातील वाटलुज या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार विरधवल जगदाळे आणि संजय भोसले यांच्या प्रचारार्थ गावामध्ये जोरदार प्रचार सुरू. वाटलुज गावातील नागरिकांमध्ये आणि घरोघरी जाऊन भोसले आणि जगदाळे यांच्या प्रचाराच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचून आपल्या असणाऱ्या कामांच्या बाबतीत व विकासाच्या बाबतीत होणाऱ्या घडामोडींबाबत नागरिकांमध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रतिसाद द्यावा अशी एक प्रकारची हाक साथ मागत आहेत.
यावेळी त्यांना आलेला अनुभव व महिला,वृद्ध मतदारांनी त्यांच्या अडचणी त्याच्याजवळ यावेळी व्यक्त केल्या. भोसले आणि जगदाळे यांनी तुमच्या असणाऱ्या सर्व अडचणी आम्ही निवडून आल्यानंतर सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन यावेळी मतदारांना दिले देण्यात आले आहे.