शिष्यवृत्ती परीक्षेच्या आवेदनपत्रांना १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिष्यवृत्ती परीक्षेच्या आवेदनपत्रांना १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

२६ एप्रिल २०२६ रोजी होणार प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा

मुंबई/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवीच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळा नोंदणी तसेच विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम तारीख आता १३ फेब्रुवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे अद्याप अर्ज न भरलेल्या शाळा, पालक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्यातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. त्यामुळे दरवर्षी या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी अर्ज करतात.

परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र www.mscepune.in आणि www.puppssmsce.in या अधिकृत संकेतस्थळांवर भरता येणार आहेत. नियमित शुल्कानंतर विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची सुविधा १४ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. तसेच, २१ ते २४ फेब्रुवारीदरम्यान अतिविलंब शुल्कासह, तर २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अतिविशेष विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

२८ फेब्रुवारी २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती वेळेत भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच पालकांनीही याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिष्यवृत्ती परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असून, अंतिम मुदतीनंतर कोणतीही तक्रार किंवा विनंती ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे सर्व संबंधित घटकांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार आवश्यक कार्यवाही करावी.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!