तरुणांचा उत्साह यंदाची शिवजयंती होणार मोठ्या उत्साहात साजरी; नगरपरिषदेला स्वच्छता व रोषणाईबाबत दिले निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

तरुणांचा उत्साह यंदाची शिवजयंती होणार मोठ्या उत्साहात साजरी; नगरपरिषदेला स्वच्छता व रोषणाईबाबत दिले निवेदन.

 

अमळनेर: विक्की जाधव 

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अमळनेरच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला स्वच्छता, सजावट व विद्युत रोषणाईबाबत निवेदन देण्यात आले. शिवजयंतीच्या दिवशी शहरात विविध भागातून मोठ्या संख्येने शिवभक्त येत असल्याने, शहर स्वच्छ व सुशोभित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील प्रमुख रस्ते, चौक, शिवाजी महाराजांचे पुतळे व कार्यक्रम स्थळ परिसरात स्वच्छता, आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई तसेच आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शिवजयंती हा उत्सव अधिक भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी नगरपरिषदेने सकारात्मक व तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी समितीने केली आहे.यावेळी सार्वजनिक शिवजयंती समितीचे सदस्य अमर सोनार, राकेश शेटे, पंकज भोई, उज्ज्वल पाटील, पारस धाप, अभिषेक सोनार, गोकुळ पाटील, आशिष अंधारे, राहुल अहिरे, शुभम पाटील, मोहित पाटील, मनोज शिंगाणे आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!