डी. आर. कन्या शाळेचे क्रीडा स्पर्धांमध्ये दुहेरी यश!

अपनी भाषा में पढ़े! Translate

डी. आर. कन्या शाळेचे क्रीडा स्पर्धांमध्ये दुहेरी यश!

 

अमळनेर: विक्की जाधव 

युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत जळगाव यांच्या वतीने आयोजित विविध क्रीडा स्पर्धा २०२५- २६ नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये अमळनेर येथील डी. आर. कन्या शाळेने खो-खो व कबड्डी (मुली) या दोन्ही क्रीडा प्रकारांत दैदिप्यमान यश संपादन करत दुहेरी विजय मिळवला. या स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा भव्य बक्षीस वितरण समारंभ पी. बी. ए. स्कूलच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. आर. कन्या शाळेचे चेअरमन श्री. योगेशदादा मुंदडा होते. प्रमुख बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्याचे माजी आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री तथा अमळनेरचे आमदार श्री. अनिलदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी खा. शि. मं. स्वीकृत सदस्या ताईसो वंसुधरा लाडगे, जळगाव समन्वयक श्री. नितीन नेरकर, प्रा. अशोक पवार, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, प्राचार्य श्री. जे. एस. देवरे यांची मान्यवर उपस्थिती लाभली. तर स्पर्धांमध्ये खो-खो (मुली) मध्ये डी. आर. कन्या शाळा अमळनेर विजयी ठरली, तर कबड्डी (मुली) मध्येही डी. आर. कन्या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. कबड्डी (मुले) मध्ये पी. बी. ए. इंग्लिश स्कूल अमळनेरने विजय मिळवला. धावणे व गोळाफेक स्पर्धांमध्येही विविध शाळा व महाविद्यालयातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. सर्व विजयी खेळाडूंना ट्रॉफी व पदक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा प्रमुख श्री. एस. पी. वाघ सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती आर. एस. सोनवणे मॅडम यांनी केले. या यशामुळे अमळनेरच्या क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!