सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; तीन महत्त्वाची खाती सोपवली

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; तीन महत्त्वाची खाती सोपवली

मुंबई/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज लोकभवन येथे सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. साध्या स्वरूपात पार पडलेल्या या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी तसेच पवार कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती खाती असतील, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेली बहुतांश खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असून, अर्थ खात्याचा मात्र अपवाद ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ मंत्रालयाचा प्रभार स्वतःकडेच राखून ठेवला आहे.

राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होणार असून, त्याच्या तयारीचे काम सध्या सुरू आहे. अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास ही तीन महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच प्रशासकीय जबाबदारी स्वीकारत असून, त्यांना थेट अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. अल्प कालावधीत अर्थसंकल्प सादर करायचा असल्याने आणि त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा विचार करता हा निर्णय घेण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!