नवभारत इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनात उमटले लघु भारताचे दर्शन! पुणे-मुंबईच्या कार्यक्रमांची आठवण करून देणारे भव्य आयोजन; सुनिता देवी यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा शहरातील नवभारत इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा काल अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून नूतन नगराध्यक्षा मोहिनी सावंत, नगरसेविका चैत्राली सावंत, स्वाती फंड, डॉ. कविता कांबळे, माजी नगरसेवक तथा अर्बन बँकेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, ग्लोबल सायन्स चे संस्थापक निकत, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एकाच छताखाली संपूर्ण भारताचे सांस्कृतिक दर्शन घडले. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्वेसर्वा सुनिता देवी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या शिस्तबद्ध नियोजनाची सध्या पंचक्रोशीत चर्चा होत आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे मुलांनी सादर केलेली विविध राज्यातील लोकनृत्ये आणि कलाप्रकार. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या विविध प्रांतांची संस्कृती मंचावर अवतरली होती. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हा सोहळा प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरला.

कार्यक्रमाचा दर्जा इतका उच्च होता की, विद्यार्थ्यांची वेशभूषा (ड्रेपरी), भव्य बॅकग्राउंड स्क्रीन आणि प्रकाशयोजना पाहून उपस्थितांना आपण पुणे किंवा मुंबई सारख्या महानगरातील एखाद्या व्यावसायिक कार्यक्रमात आहोत की काय, असा भास होत होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतके मोठे आणि दर्जेदार व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.

सुनिता देवी मॅडम शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेत असलेले कष्ट या सोहळ्याच्या यशातून दिसून आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने केवळ शैक्षणिकच नव्हे, तर सांस्कृतिक क्षेत्रातही मोठी झेप घेतली असल्याचे यावेळी बोलले गेले.

या सोहळ्यासाठी पालक, शिक्षणप्रेमी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सुनिता देवी व त्यांच्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!