अजितदादांना’तांदुळवाडी ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…
माढा/प्रतिनिधी:-

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
यांचे बारामतीजवळ काल विमान अपघातात निधन झाल्याची बातमी कळताच संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली.अजित पवार यांचा मृत्यू हा महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणासाठी कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण करणारी घटना बुधवारी सकाळी घडली.या भीषण अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे.विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार,त्यांचे सहकारी विदीप जाधव आणि पिंकी माळी यांचा समावेश आहे.विमानातील क्रूमध्ये कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक होते.कॅप्टन सुमित कपूर हे पायलट होते आणि शांभवी पाठक सह-पायलट होते.या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.वयाच्या ६६ व्या वर्षी अजित पवार यांनी सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.मुंबई पोलिस शिपाई विदिप जाधव यांचे आज कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी निधन झाले.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ म्हणून कर्तव्य बजावत असताना विमान अपघातात त्यांना वीरमरण आले.
जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने तांदुळवाडी येथे सकाळी ९:वा भाजपाचे नेते रणजितसिंह शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.परंतु अजितदादा पवार यांचे निधनाची वार्ता समजताच ही सभा रद्द करण्यात आली व अजितदादांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.
अतिशय धडाडीचा नेता,दिलेला शब्द पाळणारे,ज्या गोष्टी करायच्याच आहेत ते न घाबरता करणारे,एखादी गोष्ट चुकीची जरी वाटली मग त्या गोष्टी पासून होणारे परिणामांची चिंता न करता चुकीचीच आहे असे निर्भीड,स्पष्टवादी व्यक्तिमत्व,म्हणजे अजितदादा. माढा,करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास साधत असताना मा.आमदार बबनदादा शिंदे,मा.आमदार संजयमामा शिंदे यांना अजितदादा पवार यांचे खूप मोलाचं व सातत्याने सहकार्य लाभलं.राज्यामध्ये अतिशय धडाडीचा आणि स्पष्टवादी वक्ता नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड झाला आहे.अशी भावना रणजितसिंह बबनराव शिंदे यांनी व्यक्त केली.यावेळी पृथ्वीराज सावंत,पंडित देशमुख,प्रतिक देशमुख,तात्या साहेब तरंगे,सरपंच रणजितसिंह पाटील, प्रमोद भोसले, महादेव परबत,गणेश परबत,नामदेव भोसले,धनंजय काटकर,नागनाथ कदम,आप्पासाहेब गवळी,सह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.
तर संध्याकाळी तांदुळवाडी ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी संघटना चौकात राजकारणातील सर्वपक्षीय तसेच सामाजिक,व्यावसायिक,शेतकरी यांच्या वतीने अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.अमर रहे अमर रहे…अजित दादा अमर रहे… परत या परत या… अजितदादा परत या… अस म्हणत यावेळी अनेकांनी आपले अश्रू अनावर करत भावना व्यक्त केल्या.
यावेळी स्वाभिमानीचे आजिनाथ परबत,मा.चेअरमन ( पत्रकार) अतुल गवळी,नागनाथ जाधव,मा.उपसरपंच राजाभाऊ शिंदे,उद्योजक अक्षय परबत यांनी भावुक होऊन श्रध्दांजली वाहिली.यावेळी दत्तात्रय गवळी,प्रमोद पाटील,दिगंबर गवळी,रमेश गवळी,दीपक गवळी,सागर जाधव,दादा माने,महेश गवळी, कैलास गवळी,विराज चव्हाण,अमोल उबाळे,मंगेश गवळी,प्रशांत चव्हाण,दिनेश गवळी,अमित घोलप,कुणाल जाधव,नागनाथ गायकवाड,करण मुळे,अभिजीत परबत,दत्ता कदम,विनोद चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.