श्री बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालय नंदुरबार आयोजित राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्री बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालय नंदुरबार आयोजित राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप संपन्न…

नंदुरबार : श्री. बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत प्राथमीक व माध्यमीक विद्यालय, दुधाळे येथे आयोजीत विशेष हिवाळी शिबिराचा दिनांक 30 जानेवारी २०२६ शुक्रवार रोजी समारोप कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला आहे.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.न्या. श्री महेंद्र पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार हे उपस्थित होते. समारोपर संदेशात त्यांनी नंदुरबार सारख्या आदिवासीबहुल दुर्गम भागात आजही बालविवाह ही प्रथा मोठ्या प्रमाणावर आहे आणि या बालविवाह पद्धतीमुळे समाजामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात ज्यात प्रामुख्याने मुलीच्या आरोग्यविषयक समस्या तसेच मुलांना कायद्याअंतर्गत अडचणी निर्माण होत असल्याचे सांगीतले. तसेच नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा ,धडगावच्या अतिदुर्गम भागात डाकीण ही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सेवक तसेच कायद्याचे विद्यार्थी म्हणून मदत होईल अशी आशा व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे समन्वयक मा.डॉ.एम एस रघुवंशी सर यांनी विद्यार्थ्यांना जलसंपदा व पाणी अडवण्याच्या पद्धती यावर विस्तृत माहिती दिली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो कार्यक्रम अधिकारी डॉ.आशा तिवारी मॅडम यांनी करताना शिबिरात शिबिरार्थींनी कायदा सहायता, मतदार जनजागृती, महिला सबलीकरण,आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, पर्यावरण संवर्धन इत्यादी विषयांची माहिती जाणून घेतल्याचे सांगितले. तसेच यापुढे ही माहिती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहोचवता येईल व समाजाला त्याचा कसा लाभ होईल यासाठी प्रयत्न करायचे आवाहन शिबिरार्थीना केले. कार्यक्रमात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.दिनेश गावित सर, डॉ.एस.एस.हसानी सर, स्वयंसेवक राम पवार, तात्या पवार, उन्नती दावानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शेवटी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक हर्षल शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वयंसेविका शुचिता सोनार यांनी केले. शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा मंडळ संस्थेचे मा.चेअरमन श्री.अशोक अहिरे व शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी वर्गाने शिबीर आयोजनात मोलाचे सहकार्य केले. नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मा.आ.श्री. चंद्रकांत रघुवंशी, व्हाइस चेअरमन मा.श्री.मनोज भैय्या रघुवंशी, सचिव मा.श्री.यशवंत पाटील व संचालक मंडळाचा प्रोत्साहनाने व मा.प्राचार्य.डॉ.एन. डी. चौधरी सरांच्या मार्गदर्शनामुळे तसेच सर्व स्वयंसेवक,स्वयंसेविकाच्या, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहयोगामुळे सदर शिबिर यशस्वीरित्या पार पडले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!