शिवसेनेचे पराभूत नगरसेवक रमेश चव्हाण स्वीकृत पदासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून तयार!

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिवसेनेचे पराभूत नगरसेवक रमेश चव्हाण स्वीकृत पदासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून तयार!

उल्हासनगर महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक रमेश महादेव चव्हाण याने प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी न मिळाल्याने प्रभाग क्रमांक 17 मधून नगरसेवक पदासाठी शिंदे शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवली व त्यात त्यांचा दारुण पराभव झाला. गेली 30 वर्षे नगरसेवक पदाला चटावलेल्या रमेश चव्हाण यांना नगरसेवक पद न मिळणे हे “जल बिल मछली” सारखे वाटू लागले आहे. त्यामुळे त्याने निवडणुकीत पराभव होऊन देखील मागच्या दाराने स्विकृत नगरसेवक पदासाठी फिल्डिंग लावलेली आहे.
रमेश चव्हाण याला प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी नाकारण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्याच्या प्रभागातून शिंदे सेनेच्या उमेदवारांना मिळालेली धोबीपछाड. यामुळे खासदार श्रीकांत शिंदे हे रमेश चव्हाण यांच्यावर आधीपासूनच नाराज होते. तसेच विधानसभा निवडणुकीत रमेश चव्हाण यांनी शिवसेना उमेदवार डॉक्टर बालाजी किणीकर यांचा प्रचार करण्याऐवजी त्यांचे मित्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना मदत केली होती, हे गुपित राहिले नाही त्यामुळे डॉक्टर बालाजी किणीकर हे देखील रमेश चव्हाण यांच्यावर नाराज होते. रमेश चव्हाण याचा प्रभागातील प्रभाव कमी होत असताना मनसेचे नेते प्रदीप गोडसे यांनी या प्रभागात वर्चस्व असल्याचे सिद्ध केल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांनी ऐनवेळी प्रदीप गोडसे यांना शिंदे गटात प्रवेश देऊन उमेदवारी दिली. प्रदीप गोडसे यांच्या प्रभावामुळे पॅनल क्रमांक 13 मधील चारही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले. गोडसे ऐवजी रमेश चव्हाण असते तर शिंदे सेनेला हा विजय प्राप्त करता आला नसता, हे निर्विवाद सत्य आहे.
रमेश चव्हाण याला उमेदवारी नाकारण्याच मुख्य कारण त्याचा अनधिकृत बंगला व त्यामुळे त्याची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता हे देखील होते. रमेश चव्हाण यांनी आपल्या आईच्या नावे बांधलेला बंगला अनधिकृत असल्यावर (महापालिकेने त्याचे नियमतीकरण करण्याचा प्रस्ताव नाकारल्याने) शिक्कामोर्तब झाले होते. नामांकन पत्रात द्यावयाच्या प्रतिज्ञापत्रात “माझा कोणत्याही अनधिकृत बांधकामाची संबंध नाही,”असे जाहीर करायचे होते. महापालिकेच्या वतीने या बंगल्याच्या मालमत्तेवर अनधिकृत बांधकामासाठी दुप्पट शास्ती लागू झाल्याने सदर मालमत्ता अनधिकृत असल्याचे महापालिकेच्या रेकॉर्डवर सिद्ध झाले आहे. त्यामुळे रमेश चव्हाण हा नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल करण्यास अनर्ह ठरत होता. त्यामुळे पॅनलच्या निकालावर परिणाम होऊ नये म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रमेश चव्हाण याला प्रभाग तेरा मधून तडीपार करून प्रभाग 17 मध्ये पाठवून दिले. रमेश चव्हाण यांनी “मी प्रभाग 17 मध्ये पराभूत झालो तर मला स्वीकृत करावे, अशी गळ घातली होती व त्यावेळी रमेश चव्हाणची बला टाळण्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रमेश चव्हाण याला स्विकृत नगरसेवक पदाचे चॉकलेट दिले होते.
जे नियम नगरसेवक पदासाठी लागू आहेत तेच नियम स्वीकृत नगरसेवक पदासाठी देखील लागू असतात. याचाच अर्थ रमेश चव्हाण याच्या अनधिकृत बंगल्याच्या प्रकरणी रमेश चव्हाण हा लाभार्थी असल्याने व आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तो कायदेशीर वारस असल्याने त्या अनधिकृत बांधकामास जबाबदार ठरतो. याचाच अर्थ तो स्विकृत नगरसेवक पदासाठीही अपात्र ठरतो.
ही सर्व वस्तुस्थिती अवगत असताना शिवसेना शिंदे गटाने जर रमेश चव्हाण याला स्वीकृत सदस्य पदासाठी नॉमिनेट केले तर अनधिकृत बांधकामातील सहभागा बाबत त्याचे विरोधक नक्कीच त्याच्या स्वीकृत नगरसेवक पदास कायदेशीर आव्हान देतील आणि महानगरपालिका अधिनियमातील तरतूदी नुसार कलम 10 ड (1) नुसार रमेश चव्हाण याचे स्वीकृत नगरसेवक तात्काळ रद्द होऊ शकते. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने रमेश महादेव चव्हाण याला स्वीकृत नगरसेवक पदासाठी नॉमिनेट करून स्वतःचे हसे करून घेऊ नये. त्याऐवजी एखाद्या निष्ठावंत पात्र कार्यकर्त्यास स्वीकृत नगरसेवक पदासाठी नॉमिनेट करावे. आणि जर अट्टाहासाने रमेश चव्हाण याला स्वीकृत नगरसेवक पदासाठी नॉमिनेट केले तर त्याच्या विरोधात मी स्वतः कायदेशीररित्या हरकत घेणार आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
दिलीप मालवणकर
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!