भिगवण शेटफळगढे गटात वातावरण चांगलेच चिघळलेले दिसत आहे;उमेदवारीवरून तीव्र नाराजी वाढताना दिसत आहे

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण शेटफळगढे गटात वातावरण चांगलेच चिघळलेले दिसत आहे;उमेदवारीवरून तीव्र नाराजी वाढताना दिसत आहे

(निलेश गायकवाड)

पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले असल्याने भिगवन शेटफळ गटात अजून देखील उमेदवारी राष्ट्रवादीकडून तसेच अन्य पक्षांकडून जाहीर केले नसल्याने उमेदवारांकडून वातावरण चिघळताना दिसत आहे.

भिगवण शेटफळ गटात महिला सर्वसाधारण आरक्षण लागू असल्याने अनेकांनी वर्षानुवर्ष आपली तयारी ही केली होती. विविध सामाजिक उपक्रम तसेच नागरिकांच्या गाठीभेटी घेणे त्यांच्या सुखदुःखामध्ये जाणे त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे. प्रत्येक समाजातील प्रत्येक जातीतील लोकांना न्याय देण्यासाठी झगडने तसेच विद्यमान इंदापूर तालुक्याचे आमदार तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पूर्ण इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गटातील व गणातील उमेदवारी नक्की कोणाला द्यायची यांच्याकडे प्रत्येक उमेदवाराचे व प्रत्येक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दत्तात्रय भरणे नक्की कोणाला उमेदवारी देणार कोणाच्या डोक्यावरती हात ठेवणार याकडे सर्व भिगवन शेटफळ गटाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या उमेदवारी वरती भिगवन शेटफळ गटामध्ये राष्ट्रवादीत बंडखोरी अटळ राहणार आहे. आणि यामुळे सध्या तरी वातावरण पूर्णपणे चिघळत चालले आहे.

भिगवन शेटफळ गटातून इच्छुक उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमिला जाधव,मदनवाडी माजी सरपंच सारिका बंडगर,माजी सरपंच हेमा माडगे, माजी पंचायत समिती सदस्य मेघना बंडगर, विद्यमान सरपंच अश्विनी बंडगर, सोनाली स्वप्नील बंडगर यांनी मोर्चे बांधणी केली आहे.यामुळे पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे.

माडगे आणि जाधव यांच्यामध्ये अजून देखील एकत्रित पक्षातील असणारे मोर्चेबांधणीबद्दल कुठेही एकमत असताना दिसत नाही. याचे कारण जाधव आणि माडगे यांच्यातील परस्पर विरोध हा प्रत्येक निवडणुकीच्या वेळी दिसून आलेला आहे. त्यांच्यातील कोणत्याही एका उमेदवाराला पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी मिळू शकते त्यामुळे त्यांच्यातील एक गट नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे मदनवाडी येथील असेच काही चित्र आहे यामध्ये बंडगर कुटुंबामध्ये देखील परस्पर विरोधात वेगवेगळ्या भूमिका दिसत आहेत त्या ठिकाणी देखील एक मत दिसत नाही. यामुळे यांच्यातील नक्की उमेदवारी कोणाला मिळणार कशी ही गुंतागुंतीची निवडणूक भरणे सोडवण्यात यशस्वी होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेवटच्या दिवशी म्हणजे 21 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भरणे हे कोणाच्या डोक्यावरती हात ठेवतील हे अजून देखील सांगता येणे शक्य नाही त्यामुळे उमेदवारी अर्ज भिगवण शेटफळ गटातून खूप मोठ्या प्रमाणात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच भिगवन शेटफळ गटात बाजूच्या गावातील देखील मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे ते देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल करून अपक्ष राहण्याच्या भूमिकेत आहेत.

भिगवण शेटफळ गटामध्ये एकूण 18 गावे असून 41990 एकूण मतदान आहे. या गटावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आले होते. यंदा मात्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील मोठी ताकद लावली आहे. भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिकेच्या यशाबद्दल पक्षांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे त्यांना कुठेतरी विश्वास निर्माण केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असलेल्या या नाराजी नाट्यमयाचे फायदे हे भाजपला होतील का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे किंवा शक्यताही नाकारता येत नाही. येणाऱ्या काळात असून काय घडामोडी घडतात याकडे आपले लक्ष राहील..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!