अमळनेरमध्ये आधार कार्ड केंद्रांचा भोंगळ कारभार; नागरिकांच्या संयमाची परीक्षा

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरमध्ये आधार कार्ड केंद्रांचा भोंगळ कारभार; नागरिकांच्या संयमाची होतेय परीक्षा

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरात आधार कार्ड केंद्रांचा मनमानी व अस्थिर कारभार सध्या नागरिकांच्या डोकेदुखीचा विषय ठरत आहे. शहरातील अनेक ठिकाणची आधार केंद्रे बंद अवस्थेत असून जे केंद्र सुरू आहेत तेथेही शिस्त, वेळापत्रक व पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे. परिणामी शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून, आधार अपडेट, नवीन आधार नोंदणी व मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी नागरिकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्राची अजब कार्यपद्धती; नागरिकांत संताप

 

मार्मिकने केलेल्या तपासणीत शहरातील विविध आधार केंद्रांवर अनागोंदी कारभार उघडकीस आला. विशेषतः अमळनेर येथील पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्रावर कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांशी असभ्य वर्तन होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. सकाळी ६–७ वाजेपासून रांगेत उभे राहून नंबर लावलेल्या नागरिकांचे नंबर न घेता कर्मचारी ९ ते ९:३० वाजेपर्यंत उशिरा येतात आणि पुन्हा नव्याने नावांची यादी तयार करण्यास भाग पाडतात. तर काही जवळच्याचे किंवा कमिशनने व्हाट्सअप वर आधार कार्ड घेऊन कामे केली जातात असे प्रत्येक्षदर्शिचा आरोप आहे. या मनमानी पद्धतीमुळे आधी आलेल्या नागरिकांना डावलले जात असून संपूर्ण प्रक्रियेत गोंधळ व असंतोष निर्माण होत आहे.

या गंभीर प्रकाराबाबत मार्मिकने ऑनलाईन तक्रार दाखल करत अमळनेर पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्राच्या कारभारावर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.

पोस्टमास्तर यांना यासंदर्भात माहिती दिल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. तसेच शहरातील बंद पडलेली इतर आधार केंद्रे तात्काळ सुरू करण्याचीही जोरदार मागणी होत असून, यामुळे नागरिकांची गैरसोय टळेल व प्रशासन जागे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!