शिवसेना (शिंदे गट) अमळनेर तालुका प्रमुख पदी सुरेश पाटील यांची नियुक्ती
अमळनेर : विक्की जाधव
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार अमळनेर तालुका प्रमुखपदी सुरेश अर्जुन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा प्रचार व प्रसार करत, पक्षवाढीसाठी सर्वांना बरोबर घेऊन कार्य करतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
संसदरत्न खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सुरेश पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून, या नियुक्तीपत्रावर शिवसेना सचिव संजय मोरे यांची सही आहे.
या वेळी पारोळा आमदार अमोल पाटील, पाचोरा आमदार किशोर पाटील, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील, उत्तर महाराष्ट्र सहसचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख सुनील चौधरी, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, महिला जिल्हाप्रमुख सारिका माळी, अमळनेर शहरप्रमुख संजय कौतिक पाटील तसेच तालुक्यातील व जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या नियुक्तीनंतर पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांनी शाल, श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच माजी आमदार चिमणराव पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी जि.प. सदस्य व जळगाव युवा नेते प्रताप गुलाबराव पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, डॉ. राजेंद्र पिंगळे, अमित ललवाणी, युवा सेना जिल्हाप्रमुख रोहित कोकटा, उपशहर प्रमुख प्रवीण पाटील, जालना जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील, रिटा बाविस्कर, डॉ. प्रशांत शिंदे, ढेकू सिम सरपंच सुरेखा प्रवीण पाटील, हेडावे माजी सरपंच रवींद्र पाटील, रितेश बोरसे, ग्राहक कल्याण मंच जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर आदींनी सुरेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या.