अमळनेरमध्ये अनधिकृत कुंटनखाना व्यवसायाविरोधात नागरिकांत संताप
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेरच्या गांधलीपुरा परिसरातील वेश्या व्यवसाय त्वरित बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे. 7 मार्च रोजी शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय संघटनांचा मोठा सहभाग होता.
उच्च न्यायालयाने 9 ऑक्टोबर 2024 रोजी दिलेल्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. काल आयोजकान कडून पत्रकार परिषदेत रहिवासी वस्तीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायामुळे होणारे सामाजिक, आर्थिक आणि मानसिक परिणाम, महिलांची सुरक्षितता, अवैध व्यवसाय, आणि गुन्हेगारी वाढत असून यावर प्रकाश टाकण्यात आला.
प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.