अमळनेर फार्मसी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबीर संपन्न..
अमळनेर : विक्की जाधव
खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व.पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर व स्व.प्रार.का. केले औषध निर्माणशास्त्र
महाविद्यालय येथे अखिल भारतीय औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष मा.आमदार श्री जगन्नाथजी शिन्दे यांच्या ७५ व्या वाढदिवासाचे औचित्य साधून खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व.पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर व स्व.प्रा.र.का. केले औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय व अमळनेर तालुका औषध विकेता संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थ्यी परीषद व अमळनेर नगरीतील विवीध सामाजिक संघटना यांचे संयुक्तपणे, युवक सप्ताह २०२५ अंतर्गत “”भव्य रक्तदान शिबीर” दि.२४ जानेवारी २०२५ सकाळी ०९ ०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत आयोजित करण्यात आले
या राष्ट्रीय व सामाजिक उपक्रमास समाजातील सर्व रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त परिसाद मिळाला व विवीध रक्तगट असणाऱ्या सुमारे ८० बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले त्यात प्रामुख्याने अमळनेर तालुका औषध विकेता संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, महेश पवार, फार्मसी महाविद्यालयातील प्रा.देवेश भावसार,प्रा.अनिल बोरसे, प्रा.गितांजली पाटील प्रा.सतिष ब्राम्हणे, प्रा.डॉ.बाळसकर, प्रा.डाॅ.विवेक बडगुजर, सागर पाटील, किशोर बुलके, कुंदन पाटील., एम एस पी सी चे पदाधिकारी श्री.भूषण भदाणे अभाविपचे कल्पेश पाटील, अभिषेक पाटील व अमळनेर शहरातील इतर सर्व दानशूर रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या भव्य रक्तदान शिबीरास विद्यमान खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, खान्देश शिक्षण मंडळाचे सर्वा पदाधिकारी डॉ.अनिलजी शिन्दे विश्वस्त सौ.वसुंराताईं लांडगे, चिटणीस प्राचार्य डॉ.ए.बी.जैन सर, प्रा.डॉ.धिरज वैष्णव, अभाविपचे तालुका प्रमुख श्री भावेन पाटील, सुप्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ.नरेन्द्र सोनवणे, मा.सिनेट सदस्य श्री.दिनेश नाईक यांची उपस्थिती लाभली.