माहेश्वरी आकाश तुपे यांना उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या हस्ते बेस्ट स्टार्टअप पुरस्काराने सन्मानित!
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी.शेखर सिरसाठ
सविस्तर माहिती अशी की, दिनांक १९-०१-२०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे नॅशनल विंटर चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीमती अंजली धानोरकर व उद्योग क्षेत्रातील बहुचर्चित असलेले व्यक्तिमत्त्व प्रसिद्ध उद्योगपती सुनीलजी देसरडा हे होते.
तसेच माहेश्वरी आकाश तुपे यांनी अबॅकस शिक्षण प्रणाली विषयी अल्पावधीतच मिळवलेली लौकीकता, मुलांच्या दृष्टीने त्यांना देण्यात येणारे ज्ञान, अचूक रित्या ओळखून त्यांना त्या प्रामाणेच शिक्षण पध्दतीचा अवलंब करणे सध्याच्या काळात गरजेचे असून,याचा सारासार विचार केला गेला.
करिता, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर व प्रसिद्ध उद्योगपती सुनीलजी देसरडा यांच्या हस्ते माहिकाश सुपर अबॅकस अकॅडमीच्या संचालिका माहेश्वरी आकाश तुपे यांना बेस्ट स्टार्टअप अवॉर्ड व नवरात्री अप्रेसेस अवार्ड २०२५ ने सन्मानित करण्यात आले. यावेळी सुपर अबॅकस चे सर्वेसर्वा मनीष महाजन, प्रवीण जाधव, राजेश परदेशी, विनोद जैन,श्रीमती रेखा, श्रीमती अश्विनी आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.