June 29, 2025 8:02 am

रोहिणी विद्यालयात आर्थिक साक्षरता अभियान अंतर्गत मार्गदर्शन वर्ग संपन्न…

अपनी भाषा में पढ़े! Translate

रोहिणी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार माध्यमिक विद्यालयात सलाम फौंडेशन मुंबई अंतर्गत आर्थिक साक्षरता अभियान अंतर्गत मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रल्हाद द. सोनार होते.

विद्यालयातील उपशिक्षक नितिन शिंदे यांनी विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व, दैनंदिन खर्च, बजेट हाताळण्यास व कर्ज कसे टाळता येईल तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी (NEP 2020) आर्थिक साक्षरतेचा संबंध याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी पूर्व चाचणी व त्यातील घटकांबद्दलही माहिती दिली. त्यांनी बचती बाबत विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी उत्तरे देऊन उत्तम प्रतिसाद दिला.

यावेळी आर. एन. पावरा, आर. बी. सुर्यवंशी, व्ही. एस. बागुल, आर. डी. डुडवे, एस. एम. राठोड उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन वाय. एन. गुरव यांनी तर आभार प्रदर्शन एच. एच. शिरसाठ यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!