लोक कलावंत जगला पाहिजे- बाळासाहेब सरवदे

अपनी भाषा में पढ़े! Translate

लोक कलावंत जगला पाहिजे- बाळासाहेब सरवदे

निरा नरसिंहपुर: दिनांक -1, प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
रविवार दिनांक ३१ मार्च रोजी जंक्शन ता इंदापूर येथे तालुक्यातील सर्व लोक कलावंताची बैठक बाळासाहेब सरवदे यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आली होती .यावेळी बोलताना बाळासाहेब सरवदे यांनी लोक कलावंताच्या अडचणी ‘ आणि त्यावर उपाय काय करावे लागतील या विषयी त्यांनी भूमिका मांडताना लोक कलावंत जो लोकांमध्ये जावून समाज जागृती ‘ लोकांचे प्रबोधन ‘ मनोरंजन करतो त्याला कलेच्या माध्यमातून प्रपंच चालविण्या पूरता पैसा मिळतो. त्यामूळे लोक कलावंताचा आर्थिक स्तर आहे. त्याच स्तरावर आहे त्यामूळे त्यांची मुले शिक्षणा पासून वंचित राहत आहेत .प्रसंगी त्यांची उपासमार होते. त्यामुळे लोक कलावंत जगला पाहिजे या गोष्टी कडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले . शासनाच्या कलावंता साठी ज्या योजना आहेत त्या योजना पासून ग्रामीण कलाकार वंचित आहे. त्यामुळे शासनाकडून ग्रामीण भागातील कलावंताचा सर्वे करून त्यांना सरकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब सरवदे यांनी या बैठकीत केले.
यावेळी जेष्ठ नेते कवि सु . ग साबळे ‘ लोकगायक विजय सरतापे ‘ अभिनेते नेताजी लोंढे ‘ तमाशा कलावंत कुमार साठे ‘ कवि गायक भिमराव चितारे ‘ गायक दिलीप भोसले ‘ यांनी आपले विचार व्यक्त केले पुढील सात एप्रिल रोजीच्या बैठकीत लोककलावंताची नवीन संघटना इंदापूर तालुक्यात सुरु करावी असे सर्वांच्या विचाराअंती ठरविणेत आले यावेळी इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य लोक कलावंत उपस्थित होते.
या बैठकीचे संयोजन बेंजो मास्तर नाथा सरतापे यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!