June 30, 2025 6:30 am

जि.प.प्राथमिक शाळा खोकरपाट येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विद्रोही विचार तथा कृती थोरांची ओळख कार्यक्रम झाला संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

जि.प.प्राथमिक शाळा खोकरपाट येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विद्रोही विचार तथा कृती थोरांची ओळख कार्यक्रम झाला संपन्न..
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर येथे कर्मवादी, मानवतावादी विद्रोही संत गाडगेबाबा यांचे विद्रोही विचार तथा कृती थोरांची ओळख! या उपक्रमात चित्रकलेसोबत नाट्यीकरणातून समजून घेत विद्यार्थ्यांनी जातीभेद निर्मूलन कार्य समजून घेतले जाती-पोटजाती ही परमेश्वराची निर्मिती नसून ती मानवाची लबाड,कपटी तथा विषमतावादी माणसांची च निर्मिती आहे! तेव्हा माझी,तुमची आणि सर्वांची जात एकच आहे आणि ती म्हणजे माणूस आहे!व माणूस असल्याचा मला अभिमान आहे! हा संत श्री गाडगे बाबांचा विद्रोही विचार विद्यार्थ्यांना गाडगेबाबा जयंती निमित्ताने यावेळी समजून घेता आला! थोरांची ओळख या उपक्रमात थोर विभूतींचा जीवन कार्याचा परिचय नाट्यीकरणातून समजून घेतांना सोबत चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थोरांची ओळख देखील कृतीयुक्त व आनंददायी पद्धतीने करून दिली जाते…या उपक्रमात सहभागी विद्यार्थी मानवतावादी विज्ञानवादी कर्मवादी विद्रोही विचार कृतीयुक्त पद्धतीने समजून घेत असल्याने व प्राथमिक स्तरावरच विद्यार्थ्यांना या जगात माणूस व माणूसकी हेच उच्च मानवी मूल्ये आहेत याची देखील जाणीव होत आहे. यां उपक्रमाची निर्मिती व संकल्पना शाळेतील उपक्रमशील शिक्षक भैय्यासाहेब साळुंके यांची असून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. मुख्याध्यापक रोहिणी बडगुजर आणि उपशिक्षक महेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!