June 30, 2025 3:11 am

निलंबित पोलीस निरीक्षक बकाले याला बडतर्फ करावे तसेच चाळीसगाव RTO वसुली प्रकरणी आ. मंगेश रमेश चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदें यांची भेट

अपनी भाषा में पढ़े! Translate

निलंबित पोलीस निरीक्षक बकाले याला बडतर्फ करावे तसेच चाळीसगाव RTO वसुली प्रकरणी आ. मंगेश रमेश चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदें यांची भेट

जळगाव_ निलंबित पोलीस निरीक्षक बकाले याला बडतर्फ करावे तसेच चाळीसगाव RTO वसुली प्रकरणी आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदें यांची भेट घेतली व सविस्तर पत्र दिले. दोन्ही घटनांचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी निलंबित पोलीस निरीक्षक किरण बकाले याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे पोलीस महासंचालक यांना दिले आहेत.
तसेच सर्वसामान्य ट्रक व वाहन चालक यांच्याकडून हफ्ते घेणाऱ्या चाळीसगाव येथील RTO वसुली प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांनी आरोप केलेले राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही तसेच त्यांना अभय देणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी- कर्मचारी यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांना दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे RTO यांना हफ्ता देणाऱ्या १०० ट्रक व वाहन चालकांची यादी दिली असून त्यांचा जबाब घेतला जाणार आहे.
माझी लढाई ही कुठल्या व्यक्ती अथवा जाती विरोधात नसून अन्यायी, भ्रष्टाचारी व जातीयवादी प्रवृत्तीविरोधात आहे. या प्रवृत्तीमुळे गोर-गरीब, वंचित, पिडीत घटक यांच्यावर अन्याय होतो, त्यांचे शोषण होते. त्यामुळे यांना धडा शिकविण्यासाठी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माझा पाठपुरावा सुरु राहील.

  • आमदार मंगेश रमेश चव्हाण

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!