दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-24 at 8.19.51 AM

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन

(निलेश गायकवाड)

बारामती ता.23. : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पहिल्या जयंतीचे औचित्य साधून सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने
अजित दादांना सामाजिक उपक्रमातून अभिवादन करण्यात आले.

वृक्षारोपण नेत्र व आरोग्य शिबिर शालेय वस्तूचे वाटप मुलांना खाऊ वाटप यासारख्या अनेक सामाजिक उपक्रमातून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त निंबोडी येथे सरपंच संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा भव्य वृक्षरोपण उपक्रम राबविण्यात आला.

या वेळी ग्रामपंचायत परिसर मंदिर परिसर स्मशानभूमी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमात छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष मासाळ संचालक मंथन कांबळे व सरपंच संतोष सोनवणे उपसरपंच रोहित लांडगे ग्रामपंचायत सदस्य नामदेव बाड गणेश काकडे माऊली बाड माजी सैनिक पोपट निकम मोहन सोनवणे सोसायटीचे चेअरमन शिवाजी उदावंत सूर्यकांत जाचक छत्रपती हायस्कूलचे मुख्यादयाक गोवेकर सर जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक तांबोळी सर तसेच ग्रामपंचायत चे ग्रामविस्तार अधिकारी अनिल जगताप प्राथमीक आरोग्य विभागाचे कर्मचारी अंगणवाडी सेविका हेही उपस्थित होते.

डॉ. सौ अपर्णा काटे बारामती नेत्र शिबिराच्या वेळेस महिलांना पुरुषांना मुलांना व्याख्यान देऊन त्यांनी 40 महिला पुरुष यांना मोफत डोळ्याची तपासणी करून डोळ्याचे ड्रॉप वाटप करण्यात आले व त्यांना बारामतीच्या हॉस्पिटलला विनामूल्य तपासणीसाठी आमंत्रित केले व त्यांचे मोतीबिंदू झालेल्या अशा लोकांसाठी अल्प दरात मोतीबिंदू ऑपरेशन करणार असे त्यांनी ग्वाही दिली.

सरपंच संतोष सोनवणे यांच्या भाषणात स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सार्वजनिक जीवनात विकासाला नेहमीच प्राधान्य दिले पर्यावरण संवर्धन हरित विकास आणि सामाजिक उत्तरदायित्व याबाबत त्यांची भूमिका नेहमी सकारात्मक होती दादांच्या जयंती निमित्त केवळ औपचारिक अभिवादन न करता समाज उपयोगी उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्यांच्या संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली तर पर्यावरण संरक्षणाची मोठी चळवळ उभी राहू शकते. असे सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!