गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप;दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त
(निलेश गायकवाड)
मदनवाडी, ता. इंदापूर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था, मदनवाडी यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय, विरवाडी (मदनवाडी) येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देणारा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संतोषभाऊ महात्मे (अमरावती जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा संस्थापक अध्यक्ष, मेंढपाळ विकास मंच, महाराष्ट्र राज्य), अनुष्काताई भरणे (कार्याध्यक्ष, भगवानराव भरणे प्रतिष्ठान), सोमनाथजी शेंडगे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, भिगवण), संस्थेचे मार्गदर्शक दिलीप आण्णा सोट पाटील,जि. प. सदस्य प्रतिनिधी तुकाराम बंडगर, अश्विनीताई बंडगर (सरपंच, मदनवाडी), आबासाहेब देवकाते (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती), विष्णुपंत देवकाते (चेअरमन, विकास सोसायटी), सीमाताई काळंगे (पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस), राजाभाऊ देवकाते (माजी उपसरपंच), प्रमोद बापू नरुटे (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर तालुका), अक्षय शेळके (तालुकाध्यक्ष, धनगर समाज संघर्ष समिती, बारामती), सतीश सकुंडे,धनुदादा थोरात,सतीश शिंगाडे, नवनाथ नरुटे, बापू गावडे, सागर सोट पाटील, मल्हार सोट पाटील आणि आजिनाथ सकुंडे, माध्यमिक विद्यालय विरवाडी शाळेचे प्राचार्य ढवाण मॅडम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे प्रतिपादन केले. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबता कामा नये, या सामाजिक जाणिवेतून संस्थेने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजोपयोगी उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ तसेच संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील, सचिव धिरज सोट पाटील तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था, मदनवाडी ही संस्था शिक्षण, समाजसेवा आणि जनकल्याणासाठी सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवत असून, यावेळी संस्थेने 50 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. या उपक्रमाने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीची प्रभावी जाणीव संस्थेने करून दिली.