भिवापूरात विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन
दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईचा केला निषेध.
रजत डेकाटे- प्रतिनिधी
भिवापूर/मालेवाडा: नीट परीक्षेचे पेपरफुटी प्रकरण आणि दिल्ली येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ भिवापूर शहरात निदर्शने करीत, सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. नायब तहसीलदार रेश्मा निकम यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
सरकारविरोधी घोषणा देत, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाला धडक दिली. यावेळी दिल्ली येथे सोनम वांगचुक यांच्या उपोषणादरम्यान संसद भवनावर शांततापूर्ण मार्गाने मार्च काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुषपणे लाठीमार प्रकरणाचा उपस्थितांनी निषेध केला.
सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर आणि परीक्षा पद्धतीतील गोंधळावर हल्लाबोल केला.
पारदर्शकता आणावी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, लाठीमार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असेही निवेदनात नमूद आहे.