पर्यावरण संरक्षणासाठी विदर्भात राष्ट्रीय हरित लवादाचे सर्किट खंडपीठ स्थापन करा

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-22 at 11.18.26 AM

पर्यावरण संरक्षणासाठी विदर्भात राष्ट्रीय हरित लवादाचे सर्किट खंडपीठ स्थापन करा

आ. सुधीर मुनगंटीवार यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी

आ. मुनगंटीवार यांचे पर्यावरण प्रदूषणाशी संबंधित प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र

चंद्रपूरसह विदर्भातील नागरिकांना पुण्यापर्यंत धाव घेण्यापासून मिळणार दिलासा; सुलभ व प्रभावी पर्यावरण न्यायव्यवस्थेवर भर

चंद्रपूर : विदर्भातील वाढत्या पर्यावरण प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवाद (NGT) चे सर्किट बेंच नागपूर येथे तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्रजी यादव तसेच महाराष्ट्राच्या पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांना सविस्तर पत्र पाठवून विदर्भातील पर्यावरणविषयक प्रकरणांचा जलद, सुलभ आणि प्रभावी निपटारा होण्यासाठी नागपूर येथे NGT चे सर्किट बेंच सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

पत्रात आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये कोळसा खाणी, औष्णिक वीज प्रकल्प, सिमेंट, स्टील, रासायनिक उद्योग तसेच इतर प्रदूषणकारी प्रकल्पांमुळे वायू, जल, ध्वनी आणि मृदा प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या प्रदूषणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर, शेतीवर, जलस्रोतांवर, वनसंपदेवर आणि जैवविविधतेवर होत असून पर्यावरण संरक्षणासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

सध्या पर्यावरणविषयक प्रकरणांसाठी विदर्भातील नागरिकांना पुणे येथील NGT कार्यालयात जावे लागत असल्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा खर्च सहन करावा लागतो. नागपूर येथे सर्किट बेंच सुरू झाल्यास पर्यावरणाशी संबंधित प्रकरणांचा जलद निपटारा होईल, न्यायप्रवेश अधिक सुलभ होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असेही आ.मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर नागपूर येथे राष्ट्रीय हरित लवादाचे सर्किट बेंच तातडीने सुरू करण्यासाठी केंद्र शासन व संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!