विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला मिळाले यश ! DBATU परीक्षा वेळापत्रक व निकाल प्रक्रियेतील अनियमिततेचा मुद्दा विधान परिषदेत गाजला

अपनी भाषा में पढ़े! Translate

विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला मिळाले यश ! DBATU परीक्षा वेळापत्रक व निकाल प्रक्रियेतील अनियमिततेचा मुद्दा विधान परिषदेत गाजला

 

अमळनेर : विक्की जाधव 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा व्यवस्थापन व निकाल प्रक्रियेतील अडचणींचा प्रश्न अखेर शासन दरबारी पोहोचला असून, या विषयाची महाराष्ट्र विधान परिषदेत गंभीर दखल घेण्यात आली आहे.

YIN (यंग इन्स्पिरेशन नेटवर्क) महाराष्ट्र राज्यचे उपसभापती भावसार शंतनु तसेच सहकारी यशोदीप पालीवाल (मंत्री, YIN) यांनी शिरपूर येथे मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना DBATU विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींबाबत निवेदन दिले होते.

या निवेदनामध्ये DBATU अंतर्गत परीक्षांचे वेळापत्रक वारंवार बदलणे, परीक्षा नियोजनातील त्रुटी, निकाल वेळेत जाहीर न होणे, तसेच त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रिया, नोकरीच्या संधी आणि स्पर्धा परीक्षांवर होणाऱ्या परिणामांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी निर्देश दिले. त्यानंतर महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी हा महत्त्वपूर्ण विद्यार्थीहिताचा विषय विधान परिषदेत मांडला. विधान परिषदेत या विषयावर सविस्तर चर्चा होऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक उपाययोजनांना बहुमताने मंजुरी देण्यात आली.

DBATU अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रश्नाला शासन स्तरावर आवाज मिळवून देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

विद्यार्थ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णय मिळवून देण्याचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!