नंदुरबार येथे आदिवासी विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात NSUI शिष्टमंडळाची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी भेट

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260712-WA0261

नंदुरबार येथे आदिवासी विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात NSUI शिष्टमंडळाची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी भेट

 

आज नंदुरबार येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब यांची NSUI शिष्टमंडळाने पीडित आदिवासी विद्यार्थ्यांसोबत भेट घेतली. MKD कॉलेजमधील हे विद्यार्थी असून संबंधित महाविद्यालय शिंदे सेनेचे आमदार किशोर दराडे यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले.

 

सदर विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती असतानाही प्रत्येकी 1 लाख रुपये इतर खर्चाच्या नावाखाली 350 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन स्वरूपात वसूल करण्यात आले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

 

तसेच, विद्यार्थिनींवर अमानुष वागणूक देण्यात येत असल्याच्या तक्रारी देखील यावेळी मांडण्यात आल्या. हॉस्टेलमध्ये राहत नसल्याच्या कारणावरून एका विद्यार्थिनीचे कपडे व झोपण्याची गादी जाळण्यात आली. यास विरोध केल्यामुळे सर्व मुलींचे वॉशरूम दिवसभर बंद ठेवण्यात आले. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, दोन विद्यार्थिनींना मासिक पाळी चालू असल्याची खात्री करण्यासाठी महिला वॉर्डनने त्यांची शारीरिक तपासणी केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.

 

या विद्यार्थ्यांचे नर्सिंग शिक्षण सुरू असले तरी आजपर्यंत त्यांचे प्रॅक्टिकल्स घेण्यात आलेले नाहीत. याशिवाय, प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी वेगवेगळ्या महाविद्यालयांचे ओळखपत्र (ID Card) देण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

या सर्व गंभीर बाबींविषयी मा. हसन मुश्रीफ, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मा. सतेज (बंटी) पाटील, विधानसभा उपाध्यक्ष मा. नीलम गोऱ्हे आणि आमदार मा. गोकुळ गिते यांना निवेदन देण्यात आले.

 

यावेळी NSUI प्रदेश अध्यक्ष सागर साळुंके, NSUI जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. कौस्तुभ पाटील, NSUI नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर पावरा, प्रदेश महासचिव श्वेता पाटील, सचिन पावरा तसेच पीडित विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

NSUI तर्फे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!