नंदुरबार तालुका विधायक समितीची सामाजिक बांधिलकी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹21 लाखांचा धनादेश सुपूर्द

अपनी भाषा में पढ़े! Translate

नंदुरबार तालुका विधायक समितीची सामाजिक बांधिलकी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹21 लाखांचा धनादेश सुपूर्द

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.

मुंबई येथे नंदुरबार तालुका विधायक समिती, नंदुरबार यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹21,00,000 इतक्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. हा धनादेश आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नंदुरबारच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आला. या उपक्रमामुळे गरजू, आपत्तीग्रस्त व उपचारासाठी मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबार तालुका विधायक समिती तसेच आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांचे विशेष आभार मानले. समाजातील दुर्बल घटकांसाठी दिलेली ही मदत संवेदनशीलतेचे व सामाजिक जाणिवेचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आलेली ही आर्थिक मदत सामाजिक उत्तरदायित्व अधोरेखित करणारी असून, भविष्यातही अशाच प्रकारे जनहिताचे उपक्रम राबवले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!