डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांचे खरबूज पिकात क्रॉप कव्हर तंत्रज्ञानाचे मार्गदर्शनपर प्रात्यक्षिक

अपनी भाषा में पढ़े! Translate

डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांचे खरबूज पिकात क्रॉप कव्हर तंत्रज्ञानाचे मार्गदर्शनपर प्रात्यक्षिक

प्रतिनिधी : भागवत पवार – सुपे–पानसरेवाडी (ता. बारामती)

डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील कृषीदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत खरबूज पिकामध्ये क्रॉप कव्हर तंत्रज्ञानाचे मार्गदर्शनपर प्रात्यक्षिक उत्साहात पार पाडले.
या उपक्रमाद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. कृषीदूतांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी खरबूज पिकासाठी क्रॉप कव्हर तंत्रज्ञानाचे महत्त्व, त्याचा योग्य वापर आणि त्याचे फायदे सविस्तर समजावून सांगितले.

या तंत्रज्ञानामुळे पिकांचे कीड व रोगांपासून संरक्षण होते, तापमान नियंत्रण राखले जाते, मातीतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत होते तसेच उत्पादन वाढीस चालना मिळते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या वेळी शेतकरी श्रीकांत पानसरे, रोहित पानसरे, अनिकेत गदादे, बापू पानसरे, ओमकार पानसरे आदी उपस्थित होते. त्यांनी या तंत्रज्ञानाबाबत समाधान व्यक्त करत भविष्यात त्याचा वापर करण्याची तयारी दर्शवली.

प्रात्यक्षिकात सहभागी झालेले विद्यार्थी पियुष कदम, वैभव उदावंत, मिलिंद नागवडे, अभिषेक पाटील, रितेश पवार, अन्वय नलावडे आणि अनुप म्हामाने यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!