करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- .दि. २५ जानेवारी रोजी झालेल्या ऑनलाईन इंटरनॅशनल स्पर्धेत करमाळा येथील मुथा नॉलेज फाउंडेशन चे २५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सात मिनिटात १०० गणिते अचूक सोडवणे बंधनकारक होते. परंतु विद्यार्थ्यांनी चार ते पाच मिनिटांमध्ये सोडवून विक्रमांचा उच्चांक मिळवला. या परीक्षेमध्ये साडेतीन हजार विद्यार्थी राज्यातून व इतर २५ देशातून विद्यार्थी सहभागी होते. रँक मध्ये आलेले विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
फर्स्ट रँक -: श्रावणी महेश गवळी, आहिल असिफ बागवान , शर्वरी रोहित शिंदे, सानवी मनोज गंगे , शिवांजय उमेश सावंत.
सेकंड रँक -: साई सागर काळे, आर्यन तात्यासाहेब जाधव, अनुष्का ब्रह्मदेव नलवडे, नेत्राली गणेश शिरसकर, अनन्या उमेश फंड.
थर्ड रँक -: आदिती नवनाथ खरात, देवांशी संदीप शिंदे, राजवीर प्रमोद पोळ.
फोर्थ रँक -: समर्थ योगेश सूर्यवंशी.
शायनिंग स्टार अवॉर्ड -: रिदम भूपेंद्र बोराडे, योजस केतन गांधी, शिवराज अमोल ढवळे.
प्रोडिगी अवॉर्ड -: , शौर्य संभाजी शिंदे, मयंक महेश गवळी, शिवेंद्र शैलेश गरड, कृष्णा गणेश माळी, सिद्दीक अब्दुल गणी बागवान. ऑनलाइन व ऑफलाईन या दोन्हीही परीक्षेमध्ये श्रीलंके येथे होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.

वरील सर्व विद्यार्थ्यांना संस्थापिका मुथा मॅडम सहशिक्षिका स्मिता वनारसे मॅडम, राणी सावंत मॅडम, गौरी गवळी मॅडम, दिपाली भोईटे मॅडम. या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तसेच वरील सर्व विद्यार्थ्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या