अमळनेर येथील ‘गोल्डन विंग्ज स्कूल’मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर येथील ‘गोल्डन विंग्ज स्कूल’मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

 

अमळनेर : विक्की जाधव.

गोल्डन विंग्ज स्कूल या पूर्वप्राथमिक शाळेचे ३ रे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात चिमुकल्यांच्या कलागुणांना मोठा वाव मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन शहराचे सुप्रसिद्ध डॉक्टर आणि नर्मदा मेडिकल फाउंडेशनचे संचालक मा. डॉ. संदीप जोशी यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट मा. श्री. अजय हिंदुजा आणि विपुल गारमेंट्सचे मालक व उद्योजक मा. श्री. राजेश कुंदनानी उपस्थित होते.शाळेतील ३ ते ५ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘मोबाईल फोन आणि सोशल मीडियाचे दुष्परिणाम’ या विषयावर एका उत्कृष्ट नाटिकेद्वारे मुलांनी प्रभावी संदेश दिला. या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनीच नव्हे, तर पालकांनीही सहभागी होऊन आपले कलागुण सादर केले.वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना व सहभागी पालकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. हे पारितोषिक वितरण मा. डॉ. संदीप जोशी, मा. श्री. अजय हिंदुजा आणि उद्योजक मा. श्री. राजेंद्र कुंदनानी यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. सतीश बडगुजर, सदस्य श्री. दीपक वाच्छानी(सुधाम cloth stores), सौ. हितांशी वाच्छानी, सौ. क्रांती बडगुजर तसेच शाळेतील सर्व शिक्षक, पालक व शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद सादरीकरणाचे मुक्तकंठाने कौतुक केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!