मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रवीण माने यांना ताकत दिल्याने भविष्यात इंदापूर तालुक्यातील प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलणार !
(निलेश गायकवाड)
पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह नुकताच मुंबईत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे इंदापूर तालुक्यात भाजपच्या राजकारणाला नवा दिशा आणि बळ मिळाले आहे. विधानसभेला अपक्ष म्हणून ३५ हजारांहून अधिक मते घेणारे माने हे तालुक्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नेतृत्व मानले जाते.
सोनाई परिवाराचे मार्गदर्शक दशरथ माने यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण माने यांनी गावागावांत कार्यकर्त्यांचे सशक्त जाळे उभे केले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गावांमध्ये विकासनिधी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांची संघटन क्षमता, कार्यकर्त्यांवरील प्रभाव पाहता येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला अच्छे दिन येतील, असे चित्र निर्माण झाले आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असताना, माजी कृषिमंत्री शरद पवार आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामांत प्रवीण माने यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. सोनाई परिवाराच्या माध्यमातून तालुक्यातील दुग्ध व्यवसायाला मोठा आधार देत, शेतकर्यांना आर्थिक संजीवनी मिळवून दिली.
भाजप प्रवेशानंतर लगेचच प्रवीण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत इंदापूर नगरपालिकेच्या प्रश्नांपासून ते तालुक्यातील शेती पाणीवाटपाच्या वंचित भागांचा मुद्दा त्यांनी मांडला. त्यामुळे माने यांची थेट मुख्यमंत्र्यांशी असलेली सुसंवादाची चैन विकास निधी खेचून आणण्यास निर्णायक ठरेल, असा विश्वास स्थानिक स्तरावर व्यक्त होतो आहे.
नवसंजीवनी मिळाली आहे. भाजपचे जिल्हा नेते आमदार राहुल कुल व माने कुटुंबीयांमधील स्नेहसंबंधांमुळे भाजपमध्ये समन्वयपूर्ण आणि बळकट संघटन उभे राहण्याची शक्यता आहे. राज्य व केंद्र सरकार भाजपचेच असताना, माने यांच्यासारखा उद्योजक, कार्यक्षम नेतृत्व भाजपमध्ये आल्याने
तालुक्यात उद्योग क्षेत्रात नवसंधी निर्माण होण्याची अपेक्षा युवकांमध्ये निर्माण झाली आहे. भाजपमधील अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी माने यांना प्रवेश करण्याचा आग्रह महिन्यांपासून केला होता. अखेर हा आग्रह पूर्णत्वास गेल्याने जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये एकात्मता निर्माण झाली आहे.